मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत निलेश राणे यांचा शिवसेनेत दिमाखात प्रवेश

माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांची प्रमूख उपस्थिती

कुडाळ : निलेश राणे हे स्वगृही परतले आहेत, ही घर वापसी आहे. मी त्यांचे स्वागत करतो आशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांनी माजी खासदार निलेश राणे यांचे शिवसेनेत स्वागत केले. आणि सभा मंडपात एकच जल्लोष झाला.

हातात शिवधनुष्य घेऊन निलेश राणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि हजारो उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाज केली. निलेश राणे आगे बशी हम तुम्हारे साथ है या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

राणे साहेबांचा विजय ये झांकी है, निलेश राणे अभी बाकी है, निलेश राणे यांच्या हातात शिवधनुष्य शोभून दिसते असे सांगत येणाऱ्या २३ तारखेला निलेश राणे यांच्या विजयाचे फटके फोडण्यासाठी मी इथे येणार असल्याचेही मुख्यमत्री म्हणाले