शिवसेनेतील नव्या इनिंगला दिल्या शुभेच्छा
सावंतवाडी । प्रतिनिधी : माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केलेले सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांची सावंतवाडीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयात भेट घेत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यापुढे आपण सर्वजण मिळून एकत्र काम करू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, विधानसभा मतदारसंघ प्रमुख प्रेमानंद देसाई, तालुकाप्रमुख बबन राणे, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता कविटकर, सुरज परब, सुजित कोरगावकर, आबा केसरकर, प्रसन्ना शिरोडकर, नंदू गावडे, रोहीत पोकळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकी संदर्भात देखील चर्चा केली. यावेळी मंदार नार्वेकर, गुरुनाथ सावंत, सत्यवान बांदेकर, परीक्षित मांजरेकर, विनोद सावंत, हेमंत बांदेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.












