राजापूर (वार्ताहर): येथील श्री धुतपापेश्वर सोसायटीच्या नूतन अध्यक्षपदी प्रकाश आमकर यांची तर उपाध्यक्षपदी प्रभाकर कदम यांची बिनविरोध निवड झाली आहे.
सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश बांदिवडेकर व उपाध्यक्ष पुरूषोत्तम खांबल यांनी आपला नियोजीत कार्यकाळ संपल्याने पदाचा राजीनामा दिल्याने ही निवडणुक घेण्यात आली.
सहाय्यक निबंधक कार्यालयाचे सहा. अधिकारी राहुल खडसे यांच्या अध्यक्षतेखाली ही नुकतीच ही निवड प्रक्रिया पार पडली. आगामी अडीज वर्षासाठी अध्यक्षपदी श्री. आमकर यांची तर उपाध्यक्षपदी श्री. कदम यांची सभासदांनी बिनविरोध निवड केली.
श्री धुतपापेश्वर सोसायटी गले ५७ वर्षे कार्यरत आहे. सोसायटीचे ५३३ सभासद असून शेअर भागभांडवल सुमारे २१ लाख आहे. यावर्षी सभासदांना १० टक्के प्रमाणे लाभांश देण्यात आला आहे. यावेळी नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी माजी सभासद सोनल बावकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उल्हास खडपे, सदस्य संदीप पुजारी, उमेश शिवगण, अरविंद मांजरेकर, अमोल सोगम, निलेश मांजरेकर, गोविंद मुगे, सुधाकर ठुकरूल, विश्वनाथ आरेकर, सचिव दिपक गुरव आदी उपस्थीत होते.











