वेंगुर्ले | प्रतिनिधी : सिद्धार्थ कलाविष्कार युवा मंडळ तुळस यांच्या वतीने तुळस सिद्धार्थनगर येथे बुद्ध पौर्णिमा व भीम जयंती निमित्त आयोजित ‘सांस्कृतिक महोत्सव २०२३’ मधील जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेचे उद्घाटन विशाल सेवा फाऊंडेशन चे संस्थापक तथा भाजपा, युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या हस्ते करण्यात आले.
विशाल सेवा फाऊंडेशन पुरस्कृत आणि सिंधुदुर्ग रस्सीखेच संघ यांच्या मान्यतेने ही स्पर्धा होत असून या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला तुळस सरपंच रश्मी रामचंद्र परब, उपसरपंच सचिन नाईक तसेच माजी सरपंच श्री शंकर घारे, श्री. विजय रेडकर , ग्रामपंचायत सदस्य श्री.जयवंत तुळसकर, सौ.चरित्रा परब, सौ. रतन कबरे तंटामुक्त अध्यक्ष श्री. मंदार तुळसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
Home सिंधुदुर्ग वेंगुर्ले तुळस येथील जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेचे युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते झाले...












