वेंगुर्ले : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित इयत्ता आठवी एन एम एम एस २०२६ या शिष्यवृत्ती परीक्षेत वेंगुर्ले तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा या शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे.
या परीक्षेमध्ये कु. वैदेही प्रसाद पवार, कु. संस्कृती सुदेश चिपकर, कु. वेदांत सावळाराम नाईक, कु. गाथा दत्ताराम कोळंबकर, कु. स्वरा सचिन डिचोलकर, कु. चिन्मयी तुकाराम गावडे आणि कु. कादंबरी यशवंत कुबल या विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होत यश मिळवले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक दिपक बोडेकर सर, प्रथमेश ठाकूर सर, गायत्री चेंदवणकर मॅडम, तृणाली माळकर मॅडम व पालकांचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अश्वमी भिसे मॅडम, संस्थेचे चेअरमन आदरणीय वीरेंद्र कामत- आडारकर, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. रमेश पिंगुळकर ,सचिव श्री. रमेश नरसुले व सर्व संस्था कार्यकारणी पदाधिकारी तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व शिक्षक पालक संघ पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.










