५० हजारांच्या मताधिक्याने निलेश राणे यांचा विजय निश्चित!

मालवणातील शिवसेना मेळाव्यात जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा निर्धार : मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण | प्रतिनिधी : निलेश राणे यांचा विजय महाराष्ट्रात लक्षवेधी असा दैदीप्यमान असेल. महायुतीच्या माध्यमातून सर्व जोमाने काम करत असून निलेश राणे यांच्या विजयाचे मताधिक्य 50 हजार असणारच. असा निर्धार शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मालवण येथील शिवसेना मेळाव्यात व्यक्त केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जिल्हाप्रमुख म्हणून मला शब्द दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अधिक गतिमान विकासासाठी एक राज्यसभा खासदार आणि एक विधानपरिषद आमदार निधी सिंधुदुर्ग जिल्ह्याला देणार. रस्ते व अन्य रखडलेली विकासकामे सहा महिण्यात पुर्ण होतील. आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना मोठया प्रमाणात वाढेल असेही दत्ता सामंत म्हणाले.

मालवण तालुका शिवसेनेचा मेळावा बुधवारी जानकी मंगल कार्यालय कुंभारमाठ येथे कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघ महायुतीचे शिवसेना उमेदवार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या हाऊसफुल प्रतिसादात संपन्न झाला.

मेळाव्यात निलेश राणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला तर शिवसेना उपनेते संजय आग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, कुडाळ कणकवली विधानसभा समन्वयक महेश कांदळगावकर, उपजिल्हाप्रमुख राजा गावडे यांचा नियुक्तीपर सत्कार करण्यात आला. यावेळी आनंद शिरवलकर यांना शिवसेना उपजिल्हाप्रमुख, सुरेश चौकेकर जिल्हा सरचिटणीस, मंदार लुडबे युवा जिल्हा संपर्क प्रमुख पदी नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.

यावेळी कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, संघटक रुपेश पावसकर, उपाजिल्हा प्रमुख विश्वास गांवकर, तालुकाप्रमुख राजा गांवकर, महेश राणे, योगेश तुळसकर, शहर प्रमुख बाळू नाटेकर, युवासेना जिल्हा पदाधिकारी प्रितम गावडे, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, युवासेना जिल्हाप्रमुख ऋत्विक सामंत, जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष हर्षद पारकर, महिला आघाडी उपाजिल्हाप्रमुख निलम शिंदे, युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर, सरपंच पुनम वाटेगावकर, सरपंच स्नेहल बिरमोळे, सरपंच रविना घाडीगावकर, माजी सभापती सुनील घाडीगावकर, संतोष साठविलकर, संतोष कोदे, सुशांत घाडीगावकर, मंगेश गांवकर, मधुकर चव्हाण, सुधीर साळसकर, बाळा माने, दिलीप बिरमोळे, प्रसाद गावडे, पराग खोत, चंद्रकांत गोलतकर, सुरेश चौकेकर, दिलीप बिरमोळे, उमेश बिरमोळे, बाळा वेंगुर्लेकर, जे्रॉन फर्नांडिस, महेश बागवे, छोटू ठाकुर, राजु सावंत, बाळा वेंगुर्लेकर, मिहीर राणे, राजु बिडये यांसह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते. राजा सामंत यांनी सूत्रसंचालन केले.

दत्ता सामंत म्हणाले, निलेश राणे तीन वर्षापूर्वी घरी आले त्यांनी मला आमदार म्हणून उभे रहा असे सांगितले. मात्र मी तेव्हा शब्द दिला मी राणे साहेबांचा कार्यकर्ता आहे. त्यांचा या मतदारसंघातील पराभवाचा वचपा काढण्यासाठी तुम्ही उभे रहा सांगितले. मी तुमच्या सोबत आहे. हा शब्द दिला असल्याने राणे साहेबांचा आशीर्वाद घेऊन निलेश राणे यांच्या सोबत शिवसेनेत प्रवेश केला. आज पुन्हा शब्द देतो निलेश राणे मोठया मताधिक्याने विजयी होणार. महायुती सहकार्याने 50 हजाराचे मताधिक्य मिळणार असे दत्ता सामंत म्हणाले.

आमदार वैभव नाईक यांच्या काळात विकास ठप्प होता. मात्र महायुती सरकार काळात गतिमान विकास सुरु झाला. आता तर या मतदारसंघातून निलेश राणे आमदार होणार. राणे साहेब खासदार आहेत. विकास गतिमान होणार असे सामंत म्हणाले.

राणे साहेबांनी ज्यांना मोठे केले ते आज पक्ष बदलून त्यांच्यावर टीका करत आहेत. अश्या टीका होत असताना मुलगा म्हणून निलेश राणे यांनी रिऍक्शन दिली असेल तर चूक काय? असेही दत्ता सामंत म्हणाले. तसेच यापुढे उबाठा आणि महाविकास आघाडी पक्षातून प्रवेश होत राहतील असे ते म्हणाले.

यावेळी शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनीही विचार मांडताना सांगितले. मी सामान्य शिवसैनिक म्हणून शिवसेनेचे काम करणार असे मुख्यमंत्री शिंदे साहेबांना सांगितले मात्र त्यांनी उपनेते केले. दत्ता सामंत जिल्हाप्रमुख झाले. निले्श राणे आमदार होणार या सर्वांचा आनंद असल्याचे ते म्हणाले.
माजी नगराध्यक्ष महेश कांदाळगांवकर यांनीही यावेळी विचार मांडले. निलेश राणे यांच्या विकासात्मक भूमिकेचे विशेष कौतुक केले. तर निलेश राणे यांनीही महेश कांदळगांवकर नेहमी शहर विकास हेच व्हिजन ठेवून कार्यरत असतात. असे सांगत कौतुक केले. राजा गावडे यांचेही कौतुक केले. प्रास्ताविक तालुकाप्रमुख राजा गांवकर यांनी केले तर आभार बबन शिंदे यांनी मानले.