‘एक पेड माँ के नाम’ अभियान

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते वृक्ष लागवड : मालवण पंचायत समिती व पोईप ग्रामपंचायत यांच्या वतीने आयोजन

मालवण | प्रतिनिधी : शासनाच्या आदेशानुसार ‘एक पेड माँ के नाम’ हे अभियान सर्वत्र राबविले जात आहे. मालवण पंचायत समिती व पोईप ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने पोईप येथे या अभियान अंतर्गत आमदार निलेश राणे यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली.

यावेळी गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, पोईप सरपंच श्रीधर नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, तालुकाप्रमुख राजा गावडे, शहर प्रमुख दीपक पाटकर, माजी वित्त व बांधकाम सभापती अनिल कांदळकर, संतोष साटविलकर, माजी सभापती राजू प्रभुदेसाई, गट शिक्षणाधिकारी संजय माने, अधिकारी व्ही के जाधव यासंह अन्य उपस्थित होते.

देशी व पर्यावरण संतुलनास उपयुक्त रोपांच्या प्रजातीची निवड करून वृक्ष लागवड करण्यात येत आहे. ग्रामपंचायत कार्यालय परिसर विविध शासकीय कार्यालय परिसर शालेय संकुल परिसर, रस्त्याच्या दुतर्फा मोकळी माळरान जमीन, सरकारी मालकीच्या मोकळ्या जमिनीवर, इत्यादी ठिकाणी वृक्ष लागवडीची जागा निश्चित करून लागवड करण्यात येत आहे. अशी माहिती पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.