नळपाणी योजनेसाठी ५६ कोटी तसेच भाजी मंडईसाठी १३ कोटी
तर आधुनिक अग्निशमन यंत्रणेसाठी ३ कोटी २८ लाख रुपयांचा निधी मंजूर
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहरात गेली अनेक वर्षे रेंगाळलेल्या प्रकल्पांना फक्त आठ महिन्याच्या कालावधीत कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देणारे पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे सावंतवाडीकरांसाठी खरे विकास पुरूष ठरले आहेत. त्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे हे प्रकल्प आता मार्गी लागणार असून यापुढेही त्यांनी शहरावर असेच प्रेम करावे, अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस बंटी पुरोहित यांनी केली आहे.
सावंतवाडी शहरातील प्रस्तावित नळपाणी योजनेसाठी ५६ कोटी, भाजी मंडईसाठी १३ कोटी आणि आधुनिक अग्निशमन यंत्रणेसाठी त्यांनी ३ कोटी २८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे रेंगाळलेले प्रकल्प आता मार्गी लागणार असून सावंतवाडी शहराच्या विकासात त्यामुळे भर पडणार आहे. त्यामुळे कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून देणाऱ्या पालकमंत्र्यांचे आभार मानले आहेत.