शृंगारतळी (वार्ताहर) पाटपन्हाळे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व, उच्च शिक्षित, अत्यंत मनमिळाऊ, सामाजिक तसेच शैक्षणिक कार्यामध्ये सतत अग्रेसर असणारे पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन भालचंद्र उर्फ भाई चव्हाण यांचे गुरुवार दि. १ नोव्हेंबर रोजी रात्री अल्पशा आजाराने मुंबई दादर येथे निधन झाले.
भालचंद्र (भाई ) चव्हाण यांनी शाळा दहावी पर्यंतच असल्याने ग्रामीण भागातील मुलांना पुढील शिक्षणासाठी कनिष्ठ महाविद्यालय सुरु करण्यासाठी प्रयत्न केले. यानंतर बी.ए,पर्यंतची परवानगी मिळवून मुलांना उच्च शिक्षणाची संधी मिळवून दिली. संस्थेमार्फत तळवली येथे शाळा सुरु केली. तसेच संस्थेत स्व. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची शाखा सुरु केली. रत्नागिरी जिल्ह्यात पहिली मॅरेथॉन भरवली. पेशाने परिवहन विभागात प्रशासकीय अधिकारी (RTO) होते. त्यांच्या जाण्याने पाटपन्हाळे शैक्षणिक संस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पाटपन्हाळे गावावर शोककळा पसरली आहे.











