खेड मध्ये उबाठा गटाला भगदाड, शहर प्रमुख शिवसेनेत

 

खेड(प्रतिनिधी) ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उबाठा गटाला भगदाड पडले असून खेड शहर प्रमुख दर्शन महाजन यांनी मंगळवारी शिवेसना नेते रामदास कदम यांच्या उपस्थिती मध्ये जामगे येथे शिवसेनेत प्रवेश केला

उबाठा पक्षांतर्गत काम करत असताना दिली गेलेली वागणूक तसेच अंतर्गत होत असलेल्या कुरघोडी यामुळे उबाठा गटाचा राजीनामा देऊन विकासाची गंगा आणणाऱ्या आमदार योगेश कदम यांच्या सोबत राहून काम करण्या साठी आपण उबाठा गटा मधून मूळ घर वापसी होत असल्याचे दर्शन महाजन यांनी सांगितले यावेळी शिवसेना नेते रामदास कदम यांनी स्वागत करून शहराध्यक्ष कुंदन सातपुते यांच्या सह पदाधिकाऱ्यांनी महाजन यांचा सत्कार केला

यावेळी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण , तालुका प्रमुख सचिन धाडवे , चंद्रकांत कदम, पप्पू चिकणे, संजय मोदी, यांच्या सह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या