खेडमध्ये तांब्याच्या तारेची चोरी

खेड | प्रतिनिधी : खेड तालुक्यातील मौजे वेरळ येथील जगबुडी नदी रेल्वे पुलालगत नदी किनारी जॅकवेल ते पंप हाऊस दरम्यान असलेली तांब्याची तार चोरट्याने चोरून नेली आहे. २ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ ते ३ रोजी सकाळी ६ या मुदतीत ही घटना घडली.

या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.