भोस्ते प्रकरणातील आर्याला ‘स्वप्न’ रंगवण्याचा आजार

 

खेड(प्रतिनिधी) खेडमधील भोस्ते घाटाच्या जंगलातील मृतदेह प्रकरणातील स्वप्न सांगणारा योगेश पिंपळ आर्या हा बेपत्ता झाल्याने त्याचा तपास सुरू आहे. त्यांचा मानसोपचार तज्ज्ञांबाबतचा अहवाल प्राप्त झाला आहे. आर्याला स्वप्न रंगवण्याचा आजार असल्याचे त्यात म्हटले आहे. मृतदेह शेजारी सापडलेल्या माचिसवरून तामिळनाडू कोल्हापूर येथपर्यंत मजल मारली. पण अजूनही त्या मृताची ओळख समोर आलेली नाही.

स्वप्नामुळे सुमारे दीड महिन्यापूर्वी खेड-भोस्ते घाटातील मृतदेहाचा उलगडा झाला होता. योगेश पिंपळ आर्या (३०, रा. सावंतवाडी आजगांव) याला खेड-भोस्ते घाटातील डोंगरात जंगलात पुरुषाचे प्रेत
असून तो माझ्या स्वप्नात येऊन मला मदत करा, असे सांगत आहे. १७ सप्टेंबरला या बाबत आर्याने खेड पोलीस ठाण्यात तशी खबर दिली होती. पोलिसांनी याची नोंद एफआयआरमध्येही केली आहे. त्या
सावंतवाडीतील तरुणाला पडलेल्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत.

भोस्ते घाटातील घटनास्थळी त्या मृतदेहाच्या पॅन्टच्या खिशात टायगर माचिस आढळून आली होती. त्यावरून त्या अनोळखी व्यक्तीचे काही. धागेदोरे हाती येतील, यासाठी रत्नागिरी पोलीस थेट तामिळनाडूत
पोहचले. त्या तपासादरम्यान त्याची लिंक कोल्हापूर येथील माचिस वितरकापर्यंत आली आहे. त्यापुढे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मृतदेह कोणाचा, ही ओळख पटल्यास या प्रकरणाचा उलगडा होण्यास मदत होणार आहे.

यापूर्वी पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीमध्ये तरुणाने सांगितलेला घटनाक्रम आणि वस्तुस्थितीमध्ये प्रचंड तफावत असल्याने हा सर्व बनाव असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

मृताची ओळख पटण्यासाठी पोलिसांची धडपड सुरू आहे. त्यामुळे संबंधित तरुणाची मानसोपचार तज्ज्ञाद्वारे तपासणी केली जाणार होती. त्याचा आता अहवालही प्राप्त झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.