मालवण | प्रतिनिधी :
बदल हवा तर आमदार नवा… मतदारांनी केले निश्चित. या आशयाचे बॅनर, पोस्ट मालवण कुडाळ मतदारसंघात सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहेत.
मतदारसंघातील प्रत्येक मतदारांच्या घरापर्यंत पोहोचून त्यांच्या मनात घर करण्याचा चंग निलेश राणे यांनी बांधला होता तो प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. निलेश राणे यांच्या बाबत पसरविण्यात आलेले गैरसमज त्यांच्या आक्रमक शैली बाबत केली गेलेली विधाने किती निष्फळ व निरर्थक होती हे नागरिक, मतदारांना समजू लागले आहे, त्यामुळे निलेश राणे यांच्याबाबत सकारात्मक वातावरण मतदारसंघात तयार झाले असून बदल हवा तर आमदार नवा हेच घोष वाक्य प्रत्येक मतदारांच्या तोंडातून ऐकायला मिळत आहे. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी निलेश राणे यांनाच यावेळी निवडून देण्याचे मतदारांनी निश्चित केल्याचे दिसून येते. अश्या आशयाचे बॅनर सोशल मीडियात व्हायरल होत असून याची जोरदार चर्चा सुरु आहे.












