श्री स्वामी समर्थांची दिव्यांच्या स्वरूपातील प्रतिकृती भावली : मंत्री दीपक केसरकर

वेंगुर्लेतील श्री. हनुमान मंदिरात दीपोत्सव साजरा…

वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले शहरातील सर्वात जुन्या अशा मारूती स्टॉप येथील श्री. हनुमान मंदिरात हनुमान मंदिर सेवा न्यास व हनुमान भक्त मंडळातर्फे रविवारी रात्री दीपोत्सव साजरा झाला. यावेळी मंदिरातील श्री स्वामी समर्थांच्या दिव्यांच्या स्वरूपातील प्रतिकृतीचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते उदघाटन झाले. ही आरास आपल्याला खूप भावली असे मंत्री केसरकर यांनी सांगितले.

यावेळी दिलीप गिरप, नितीन मांजरेकर, उमेश येरम, सुनिल डुबळे, सुहास कोळसुलकर यांसह श्री. हनुमान मंदिर सेवा न्यासचे पदाधिकारी अजय खानोलकर, महेश मयेकर, गौरव खानोलकर, शैलेश केसरकर, गौतम गाडेकर, हरेष पाडगांवकर, सोहम सामंत, सिध्दार्थ सामंत आदींसह हनुमान भक्त मंडळाचे सदस्य तसेच शिवसेना व भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.