
संतोष कोत्रे | लांजा-: लांजा कोत्रेवाडी येथील शालेय विद्यार्थ्यांनी बनवलेला मल्हारगड विशेष लक्षवेधी ठरत आहे.
दिवाळी सणाचे औचित्य साधून कोत्रेवाडी येथील पूर्वार्थ पराडकर, स्वरूप कोत्रे, जय पराडकर, हर्षद कोत्रे या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारा मल्हारगड तयार केला आहे. हा गड सार्यांच्याच कौतुकास पात्र ठरत आहे.
छत्रपती शिवरायांच्या जाज्वल इतिहासाची साक्ष देणारा मल्हारगड पुणे जिल्ह्यातील सासवड या ठिकाणी आहे. पुण्यापासून ३० किमी अंतरावर सासवड गावी हा डोंगरी किल्ला बांधलेला आहे. पुणे सासवड मार्गावरील दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला असावा असे सांगण्यात येते.गडावरील असलेल्या मल्हारी देवीच्या नावावरून या किल्ल्याला मल्हार गडाचे नाव देण्यात आले आहे. साधारणपणे १७५६ ते १७६० या कालावधीत हा किल्ला बांधण्यात आला आहे. गडावर खंडोबा, महादेव यांची मंदिरे असून काही तलाव आणि विहिरी देखील आहेत. मराठ्यांनी बांधलेला हा शेवटचा किल्ला म्हणून ओळखला जातो .
अशाप्रकारे या किल्ल्याच्या माध्यमातून आजच्या मुलांना देखील छत्रपतींच्या इतिहासा बद्दल माहिती मिळावी, जागृती व्हावी या दृष्टीने या छोटे बच्चे कंपनीने हा किल्ला बांधला असून सध्या हा लक्षवेधी ठरत आहे.











