रत्नागिरीत निवडणुकीतून 7 जणांची माघार, निवडणूक लढविणाऱ्यांची संख्या 38

 

 

जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह

रत्नागिरी : जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदार संघातून 7 जणांनी आपले नामनिर्देशन पत्रे मागे घेतली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकूण 38 उमेदवार निवडणूक लढवित आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.
263 – दापोली, 263- रत्नागिरी आणि 267- राजापूर मधून प्रत्येकी एका उमेदवारांनी माघार घेतली आहे. तर 264 गुहागर आणि 265 चिपळूण मध्ये प्रत्येकी दोघाजणांनी माघार घेतलेली आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या 263- दापोलीमध्ये 9, 264 -गुहागरमध्ये 7, 265- चिपळूणमध्ये 6, 266- रत्नागिरी व 267- राजापूरमध्ये प्रत्येकी 8, असे एकूण 38 झाली आहे.
विधानसभा मतदार संघनिहाय निवडणूक लढवित असणाऱ्या उमेदवारांची नावे, पक्ष आणि चिन्ह आणि माघार घेतलेली नावे पुढीलप्रमाणे-
263-दापोली विधानसभा मतदार संघ – अबगुल संतोष सोनू – महाराष्ट्र नवनिर्माण सेना- रेल्वे इंजिन, कदम योगेशदादा रामदास – शिवसेना -धनुष्यबाण, कदम संजय वसंत – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) – मशाल, मर्चंडे प्रविण सहदेव – बहुजन समाज पार्टी – हत्ती, कदम योगेश रामदास – अपक्ष – हिरा, कदम योगेश विठ्ठल – अपक्ष – विजेचा खांब, कदम संजय सिताराम – अपक्ष – चिमणी, कदम संजय संभाजी – अपक्ष – शिट्टी आणि खांबे ज्ञानदेव रामचंद्र- अपक्ष – बासरी.
माघार घेतलेली नावे – खाडे सुनिल पांडुरंग
264-गुहागर विधानसभा मतदार संघ – गांधी प्रमोद सिताराम – महाराष्ट्र नवनिर्माण सेना – रेल्वे इंजिन, जाधव भास्कर भाऊराव- शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) -मशाल, बेंडल राजेश रामचंद्र- शिवसेना – धनुष्यबाण, प्रमोद परशुराम आंब्रे – राष्ट्रीय समाज पक्ष – ऑटो रिक्षा, फडकले संदीप हरी – अपक्ष – बॅट, मोहन रामचंद्र पवार – अपक्ष -शिट्टी, सुनिल सखाराम जाधव – अपक्ष – अंगठी
माघार घेतलेली नावे – संतोष लक्ष्मण जैतापकर, संदेश दयानंद मोहिते
265- चिपळूण विधानसभा मतदार संघ – प्रशांत बबन यादव – नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार- तुतारी वाजवणारा माणूस, शेखर गोविंदराव निकम- नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – घड्याळ, सौ. अनघा राजेश कांगणे – अपक्ष -शिट्टी, प्रशांत भगवान यादव- अपक्ष- ट्रम्पेट, महेंद्र जयराम पवार – अपक्ष – माईक, – शेखर गंगाराम निकम- अपक्ष – फूलकोबी
माघार घेतलेली नावे – सुनिल शांताराम खंडागळे, नसिरा अब्दुल रहिमान काझी .
266 -रत्नागिरी विधानसभा मतदार संघ – उदय रविंद्र सामंत – शिवसेना – धनुष्यबाण, बाळ माने – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) – मशाल, भारत सिताराम पवार – बहुजन समाज पार्टी – हत्ती, कैस नुरमहमद फणसोपकर- अपक्ष- वाळुचे घड्याळ, कोमल किशोर तोडणकर – अपक्ष – संगणक, ज्योतीप्रभा प्रभाकर पाटील – अपक्ष – काडेपेटी, दिलीप काशिनाथ यादव -अपक्ष – इस्त्री, पंकज प्रताप तोडणकर -अपक्ष – बॅट.
माघार घेतलेली नावे – उदय विनायक बने
267- राजापूर विधानसभा मतदार संघ – किरण रविंद्र सामंत – शिवसेना – धनुष्यबाण, जाधव संदिप विश्राम – बहुजन समाज पार्टी – हत्ती, राजन प्रभाकर साळवी – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) -मशाल, अमृत अनंत तांबडे – अपक्ष – चिमणी, अविनाश शांताराम लाड – अपक्ष – शिट्टी, यशवंत रामचंद्र हर्याण – अपक्ष – चालण्याची काठी, राजेंद्र रविंद्रनाथ साळवी – अपक्ष – बॅटरी टॉर्च, संजय आत्माराम यादव – अपक्ष – फणस.
माघार घेतलेली नावे – राजश्री संजय यादव