दापोली:
तालुक्यातील सडवे येथे सोमवार चार ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास सडवे येथील नदीवर गंभीरडोह येथे गावातील दोन युवक मासे पकडण्यासाठी गेले असता पाय घसरून पडून बुडून मृत्यू पावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सुजीत सुभाष घाणेकर (वय २५) आणि त्याचा नातलग आयुष अनिल चिनकटे (वय २१) असे दोघे सडवे येथील जालगांव पाणी योजनेच्या ठिकाणी प्रथम गेले होते. मात्र जालगांव ग्रामपंचायतीचे पंप हाऊस कर्मचा-यांनी तेथे जाण्यास रोखले. त्यानंतर ते दोघे गंभीर डोह येथे सायंकाळी साडेचारच्या सुमारास मासे पकडण्यासाठी गेले असता पाय घसरून पडले. पाणी खोल असल्याने नाका तोंडात पाणी गेल्याने ते दोघे बुडाल्याची माहिती प्राप्त होत आहे. ग्रामस्थांनी शोध घेतल्यानंतर दोघांचेही मृतदेह सापडले असून दापोली उपजिल्हारुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहे. शवविच्छेदन होऊन पोलीस पंचनामा रात्री उशिरापर्यंत सुरू होता. अधिक तपास दापोली पोलीस करित आहेत. या घटनेमुळे स
गावावर शोककळा पसरली आहे