ओरोस येथे महामार्गावर मोटरसायकल स्लीप होऊन झालेल्या अपघातात आचरा येथील महिला ठार!

 

सिंधुनगरी | प्रतिनिधी    –   मुंबई गोवा महामार्ग ओरोस येथे सायकल स्लीप होऊन झालेल्या अपघातात आचरा पिरावाडी येथील शुभ्रा आदित्य धुरी रस्त्यावर आपटून जागीच ठार झाली तर मोटर सायकल चालवत असलेला तिचा पती व तीचा छोटा मुलगा जखमी झाला . ओव्हरटेक करण्याच्या नादात मोटरसायकल वरील ताबा सुटून हा अपघात बुधवारी दुपारी अडीच वाजता झाला. आपल्या पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रमाणे तिचा पती आदित्य बापू धुरी याच्या विरोधात ओरोस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 43/2023 भादवि कलम 304 अ 279 337 338 मोटार वाहन अधिनियम कलम 184 दाखल असून याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल संकेत गहिनीनाथ मंचेकर यांनी दिली आहे.

आदित्य बापू धुरी वय 35 वर्षे राहणार आचरा पिरावाडी तालुका मालवण हा कुडाळ ते आचरा आपल्या पत्नी व मुलासह आपल्या ताब्यातील मोटरसायकल MH 07 AM 0452 निघाला असताना ओरोस ख्रिश्चनवाडी येथील सिमेंट पासून वस्तू बनवणाऱ्या कारखान्याच्या समोर गोवा मुंबई लेनवर रोडवर ओव्हरटेक करण्याच्या नादात मोटर सायकल फोन हा अपघात झाला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक हेमंत देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय वारा करीत आहेत.