….तर तेलींना निवडणूक सोडून कणकवलीत जावे लागेल : संजू परब

 

त्या बॅनरवरून शिवसैनिक आक्रमक : तेलींना इशारा

सावंतवाडी । प्रतिनिधी : महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्याविरोधात लावलेला ‘तो’ बॅनर हा विरोधी उमेदवार राजन तेली यांच्याकडून लावण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी दरोडेखोरासारखे चोरी छुपे बॅनर लावायची सवय ही तेलींनाच आहे. त्यामुळे यापुढे मतदारसंघात एकजरी बॅनर दिसला तर आम्ही असे बॅनर लावू की तेलींना निवडणूक सोडून कणकवलीत जावे लागेल, असा इशारा शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब यांनी यावेळी दिला. सावंतवाडी येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 

 

ते म्हणाले, तेलींना मी अनेक वर्षे ओळखतो. समोर येऊन लढण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही. त्यामुळे ते अंधारात लहान मुलांसारखे अशी बालीशकृत्ये करत आहेत. हिंमत असेल तर त्यांनी जाहीरपणे आरोप करावेत त्याला उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत. राणेंच्या विरोधात लावलेला हा शेवटचा बॅनर आहे. यापुढे एकजरी बॅनर लावला तर तेलींना पळताभुई थोडी करू, असा इशाराही संजू परब यांनी दिला.

 

 

सावंतवाडीत आम्हाला आम्हाला बाहेरची माणसं नको. येथील लोकप्रतिनिधी सक्षम आहेत. बॅनर विरोधात काय कारवाई करावी ते प्रशासन ठरवेल. आम्ही तक्रार करत नाही भेट औकात काढतो. त्यामुळे कुणाला शोधायची गरज नाही.‌ बॅनर कोणी लावले आम्हाला माहीत आहे. त्यामुळे यापुढे त्यांनी अशी हिंमत करू नये. आमच्या बॅनरमधील मजकूर असा असेल की ते पुन्हा बॅनर लावायची हिंमत करणार नाहीत,
असा इशाराही त्यांनी दिला.
याप्रसंगी जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, सुरज परब, हेमंत बांदेकर, क्लेटस फर्नांडिस आदी उपस्थित होते.