काजर्‍याचे फळ समजून वृद्धाने उचललेला पदार्थ ज्वलनशिल; डोर्ले-घवाळीवाडी येथील घटना

 

रत्नागिरी | प्रतिनिधी : तालुक्यातील डोर्ले-घवाळीवाडी येथे काजर्‍याचे फळ समजून ज्वलनशिल पदार्थ उचलल्यामुळे वृध्दाचा हात भाजला. ही घटना मंगळवार 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वा. सुमारास घडली.

 

 

याबाबत मनिष धोंडू घवाळी (53,रा.डोर्ले,रत्नागिरी) यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, मंगळवारी सकाळी ते गुरे चरवण्यासाठी पायवाटेने जात होते. त्यावेळी अज्ञाताने ठेवलेला ज्वलनशील पदार्थ त्यांना रानटी काजर्‍याच्या फळासारखा दिसला. त्यामुळे तो त्यांनी आपल्या हातांनी उचलला असता त्यांच्या उजव्या हातांची बोटे किरकोळ स्वरुपात भाजली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 287 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.