तारकर्ली येथील तरुणाला मालवण न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी ; राजापूर येथील फकिरबाबाचाही सहभाग
मालवण | प्रतिनिधी : एका विवाहित महिलेशी ओळख निर्माण करून त्यांच्या हॉटेलचा व्यवसाय चांगला चालण्यासाठी राजापूर येथील एका फकिरबाबा जवळ नेऊन त्याने दिलेली उदी तिला खायला लावली. त्यानंतर त्या महिलेचे आक्षेपार्ह फोटो काढून व्हायलर करण्याची धमकी देत तिच्याशी बळजबरी अतिप्रसंग केल्याप्ररकरणी चंद्रहास किसन धुरी वय ३६ रा. तारकर्ली मालवण व त्याला सहकार्य करणाऱ्या राजापूर येथील फकिरबाबा या मांत्रिका विरुद्ध मालवण पोलीस ठाण्यात अतिप्रसंग व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम व अन्य कलमांव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीत आरोपी चंद्रहास धुरी याला मालवण पोलिसांनी गुरुवारी पहाटे अटक केली. त्यानंतर त्याला मालवण न्यायालयात हजर केले असता त्याला मंगळावर ९ मे पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. सहाय्यक सरकारी अभियोक्ता तुषार भणगे यांनी काम पाहिले. ही घटना डिसेंबर २०२२ ते मे २०२३ या कालावधीत घडली आहे.
चंद्रहास याने महिलेला फकिरबाबा यांनी दिलेली उदी खायला देऊन तिचे आक्षेपार्ह फोटो काढले. ते व्हायरल करण्याची धमकी देत १५ जानेवारी रोजी महिलेचा पती घरात नसताना चंद्रहास याने घरात घुसून धमकी देत महिलेसोबत अतिप्रसंग केला. दरम्यान ३ मे रोजी त्याने पुन्हा घरात घुसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी संबंधीत महिलेने बुधवारी मालवण पोलीस ठाण्यात येऊन संशयित आरोपीच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानुसार चंद्रहास धुरी व त्याला सहकार्य करणाऱ्या मांत्रिका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान संशयित आरोपीला गुरवरी पहाटे मालवण पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला अटक करून पुढील कार्यवाही पूर्ण करत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने मंगळवार पर्यत पोलीस कस्टडी सुनावली आहे. याबाबतचा तपास पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक एस एस बंगडे करत आहेत.







