नेते रामदास कदम, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती
खेड । प्रतिनिधी: तालुक्यातील खडीपट्टा विभागातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते रामदास कदम, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थित पक्षप्रवेश केला.
हा पक्षप्रवेश सोहळा भरणे येथील बिसु हॉटेल येथे रविवारी दुपारी पडला. यावेळी शिवसेना उपनेते संजयराव कदम, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, तालुकाप्रमुख अरविंद चव्हाण, युवासेना उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दर्शन महाजन, माजी सभापती चंद्रकांत कदम, उद्योजक शैलेश कदम यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते









