जिल्हा तायक्वाँदो तांत्रिक प्रमुखपदी खेडचा ओम शिंदे

खेड (प्रतिनिधी) महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन संलग्न असलेल्या तायक्वाँदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या राज्य संघटनेने राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील तायक्वाँदो खेळाच्या प्रतिनिधींची यादी क्रीडा व युवक सेवा संचालनालयकडे दिली आहे. यातील ओम शिंदे याची जिल्हा तायक्वाँदो तांत्रिक प्रमुखपदीनिवड करण्यात आली आहे.
बोरज येथील ज्ञानदीप औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयात तो शिकत आहे. तायक्वाँदो सोबतच पिंचांक, सिलाट सारख्या अनेक मार्शल आर्ट त्याला अवगत आहेत. जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धामध्येही त्याने यश प्राप्त केले आहे. या निवडीबद्दल राज्य तायक्वाँदो संघटना अध्यक्ष संदीप ओंबासे यांनी त्याचे कौतुक केले.