प्रशांत यादव यांनी घेतली माखजन बाजारपेठेत, व्यापाऱ्यांची भेट

 

*माखजन |वार्ताहर :      चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक सध्या रंगतदार स्थितीत पोहचली आहे.महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून ,तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर लढत आहेत.

प्रशांत यादव यांनी कार्यकर्त्यांसह उपस्थित राहत माखजन बाजारपेठेत व्यापाऱ्यांसह स्थानिक रहिवाशांची भेट घेतली.यावेळी प्रचार करत ,मतदान करण्यासाठी आवाहन केले.

यापूर्वी माखजन बाजारपेठेतील समस्या व रोजगार वाढीच्या दृष्टीने प्रशांत यादव यांनी माखजन परिसरात भेटी दिल्या आहेत.या भेटी प्रसंगी योगेश रेडीज, आशिष चोचे,सतीश कुंभार,मोहन घडशी,बाबू मोरे, माजी सभापती दिलीप सावंत,अनंत गुरव,प्रसाद कोकाटे, आदींसह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.