महायुतीचे उमेवार किरण सामंत यांच्या निवडणूक संपर्क कार्यालयाचा शुभारंभ

 

राजापूर | प्रतिनिधी : राजापूर, लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांच्या निवडणूक संपर्क कार्यालयाचा शुभारंभ शुक्रवारी किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाजपा प्रदेश ओबीसी सेलचे सरचिटणीस अनिलकुमार करंगुटकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. राजापूर विधानसभा मतदार संघाच्या भविष्यातील सर्वांगिण विकासासाठी किरण सामंत यांच्यासारखा नेतृत्वाची आज आवश्यकता असून त्यांना निवडून आणण्याचा निर्धार यावेळी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अशफाक हाजू, तालुका प्रमुख दीपक नागले, भाजपा तालुका प्रमुख सुरेश गुरव, सौरभ खडपे, हनिफ काझी आदींसह यावेळी भारतीय जनता पार्टीचे शिवसेना व आरपीआय आणि घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.