मसूरे | झुंजार पेडणेकर : परब मराठा समाज मुंबई महिला विभागाच्या विद्यमाने बालदिन सोहळा 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 ते 9 या वेळेत परब मराठा समाज हॉल, पंतनगर घाटकोपर मुंबई येथे साजरा करण्यात येणार आहे
ह्या प्रसंगी ज्ञाती बांधवांच्या मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्धेशाने संगीत, वेशभूषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, बडबड गीत स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. परब समाज्यातील इयत्ता 10 वी 80%, 12 वी 75% वरील व सर्व पदवीधर उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान होणार असून अशा विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेची प्रत समाजाच्या दादर येथील कार्यालयात सां. 5 ते 8 या वेळेत (रविवार सोडून )
25 नोव्हेंबर 24 पर्यंत आणून द्यावीत.
अधिक माहिती साठी सौं अंकिता परब 9892719495 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.











