काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांचे पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबन- माजी आमदार हुस्नबानू खलिफे

 

लांजा (प्रतिनिधी) काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा राजापूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार अविनाश लाड यांनी पक्षादेश डावलून महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने त्यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित केल्याची माहिती पक्षाच्या नेत्या आणि माजी विधानसभा परिषद सदस्या हुस्नबानू खलिफे
यांनी आज लांजा येथे पत्रकारांना दिली.

 

 

आघाडीचे राजापूर विधानसभेचे उमेदवार राजन साळवी यांच्या प्रचारार्थ लांजा येथे आलेल्या माजी आमदार आणि विधानपरिषद सदस्य हुस्नबानू खलिफे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की ,या विधानसभा मतदारसंघात आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून राजन साळवी हे निवडणूक रिंगणात आहेत. मात्र असे असताना काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेले अविनाश लाड यांनी बंडखोरी केली आहे आणि म्हणूनच काँग्रेस पक्षाकडून त्यांचे सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे .
यावेळी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर माजी तालुकाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद, वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे तसेच माजी तालुकाध्यक्ष राजेश राणे, महेश सप्रे, सुरेश साळुंखे आदी पदाधिकारी उपस्थित होते.