ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत शिबीर

खेड (प्रतिनिधी) खेड पेंशनर असोसिएशन आणि कांची कांस्य थेरपी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने १७ नोव्हेंबर रोजी महाडनाका ब्रह्मकुमारी सेवा केंद्रसमोर ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत कांस्य थेरपी शिबीर घेण्यात येणार आहे.
 गुडघे व सांधे दु:खी, वात, पित्त आणि कफ प्रकोप, अर्धशिर्शी आदींसह थकवा दूर करून निद्रानाशाची समस्या कमी होण्यास थेरपीचा कसा फायदा होतो, यावर मार्गदर्शन केले जाणार आहे.
नाव नोंदणीसाठी पेन्शनर असोसिएशनचे दत्तात्रय धुमक यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे