खेड (प्रतिनिधी) कोकण मार्गावरून धावणाऱ्या जबलपूर-कोईमतूर साप्ताहिक गाडी रविवारी तब्बल ९ तास
‘लेट धावली विकेंड’ला झालेल्या रखडपट्टीने प्रवाशांना मनस्ताप सहन करावालागला. गाडी विलंबाने धावण्यामागचे नेमके कारण समजू शकले नाही.
या गाडीपाठोपाठ कोच्युवेली- एलटीटी स्पेशलही १ तास १५ मिनिटे तर दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस १ तास विलंबाने रवाना झाली. गोवा संपर्कक्रांती एक्सप्रेसही १ तास उशिराने मार्गस्थ झाली.











