अजिजा चौगुले यांचे निधन

 

 

खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील बहिरवली क्र. १ येथील सामाजिक कार्यकर्त्या व बहिरवली।महिला मंडळाच्या संस्थापिका।अजिजा उमर चौगुले (८८) सोमवारी पहाटे।वृद्धापकाळाने निधन झाले.

 

त्यांनी महिला मंडळाची स्थापना करत महिलांना एकसंघ करताना त्यांचा आर्थिक उत्कर्ष साधण्याच्या दृष्टीने मार्गदर्शकाची भूमिका निभावली होती. त्या सामाजिक कार्यात नेहमीच अग्रस्थानी होत्या. परोपकारी व मनमिळावू स्वभावाच्या म्हणून त्या परिचित होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सूना, नातवंडे असा परिवार आहे. बहिरवलीतील सामाजिक कार्यकर्ते खालिद चौगुले यांच्या त्या मातोश्री होत.