सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत जि.प. ब्राम्हणआळी शाळेचे घवघवीत यश

Sindhuratna Talent Search Exam G.P. The Brahmin Ali school was a huge success

सावंतवाडी । प्रतिनिधी : फेब्रुवारी 2023 मध्ये युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ सांगवे आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत जि.प.प्रा.शाळा मळगाव ब्राह्मणआळी शाळेने घवघवीत यश संपादन केले.या शाळेतील परीक्षेस बसलेले 7 ही विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यातील 6 विदयार्थी मेडलधारक ठरले.200 गुणांच्या परीक्षेत इ.4 थीतील विद्यार्थी दिप्तेश गुरूनाथ रेडकर याने 156 गुण मिळवून गोल्ड मेडल पटकावले तसेच त्याने जिल्हयात 49 वा येऊन जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. कु.हर्ष विश्वनाथ राऊळ (इ.4 थी)-130 गुण ब्राँझ मेडल, कु.मानस अमित कोचरेकर (3 री)-150 गुण सिल्व्हर मेडल, कु.सार्थक सुनिल पेडणेकर (2 री)-158 गुण गोल्ड मेडल,कु.विहान महेश परब ( 2 री) 152 गुण गोल्ड मेडल,कु. चैतन्य संदेश राऊळ (2 री)-144 गुण सिल्व्हर मेडल प्राप्त केले.

या परीक्षेसाठी मुख्याध्यापक श्री.प्रसाद आबा दळवी व उपशिक्षिका श्रीम. अर्चना दिगंबर तळणकर तसेच पालकांचे मार्गदर्शन लाभले.या यशस्वी विद्यार्थ्यांचे मळगाव गावचे सरपंच श्रीम.स्नेहल जामदार ,उपसरपंच हनुमंत पेडणेकर, सावंतवाडी गटशिक्षणाधिकारी श्रीम.कल्पना बोडके, आजगाव प्रभाग विस्तार अधिकारी श्रीम दुर्वा साळगावकर, मळगाव केंद्रप्रमुख श्री.शिवाजी गावीत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.जगन्नाथ राणे, उपाध्यक्ष श्री. विश्वनाथ राऊळ माजी शा.व्य.स. अक्ष्यक्ष श्री. राजेंद्र राऊळ ग्रा.पं. सदस्या श्रीम. निकिता राऊळ, शिक्षणप्रेमी गोविंद राऊळ सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व मळगाव ब्राम्हणआळी ग्रामस्थांनी अभिनंदन केले.