जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा आडवली नं. 1चा पर्यावरणस्नेही उपक्रम. –फुलपाखरू संवर्धन

 

आचरा–अर्जुन बापर्डेकर : फुलपाखरू हे पर्यावरण संस्थेचा महत्वाचा घटक आहे.मात्र वाढते प्रदुषण, किटकनाशकांचा वारेमाप वापर,जंगलतोड यामुळे हा घटक धोक्यात आला आहे.याबाबत आडवली नं १शाळेच्या मुलांनी शाळेच्या परिसरात इंडियन स्नेकवीड या वनस्पतीची लागवड करुन फुलपाखरू संवर्धनाचा वसा घेतला आहे.त्यामुळे आडवली शाळेच्या परिसरात असंख्य फुलपाखरे बागडताना दिसत आहेत.
पर्यावरण संवर्धनासाठी आडवली शाळेचा हा उपक्रम कौतुकाचा विषय बनला आहे.

छान किती दिसते फुलपाखरू या वेलींवर फुलांबरोबर गोड किती हसते फुलपाखरू
लहान पणी प्राथमिक शाळेत शिकत असताना फुलपाखरू ही कविता आजही आठवते.पण त्यावेळी दिसणारीअसंख्य फुलपाखरे आता दुर्मिळ होत चालली आहेत.वाढते
प्रदुषण, किटकनाशकांचा वारेमाप वापर फुलोऱ्यावर येण्या अगोदरच गवताची होणारी कापणी आदींमुळे पर्यावरण संस्थेचा हा घटक धोक्यात आला असल्याचे तज्ञांचे म्हणने आहे.जंगलतोडीमुळे फुलपाखरांची निवासस्थानेही धोक्यात आली आहेत. फुलपाखरांच्या अनेक जाती नष्ट झाल्याचे पर्यावरण प्रेमी सांगतात.यामुळेच पर्यावरण संस्थेतील या घटकाच्या संवर्धना बाबत जनजागृती व्हावी या हेतूने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आडवली नं१च्या मुलांनी पुढाकार घेतला आहे.त्यांनी फुलपाखरांचे आवडते खाद्य असलेली इंडियन स्नेकविड या वनस्पतीची शाळेच्या प्रांगणात लागवड केली आहे.त्यामुळे शाळापरीसरात आता असंख्य रंगीबेरंगी फुलपाखरे बागडताना दिसत आहेत..यासाठी मुलांना आवडली नं एक चे रावजी तावडे ,रामचंद्र कुबल श्रीम. तनुजा तांबे श्रीम. रागिणी ठाकूर या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.या उपक्रमाबद्दल बोलताना आडवली प्राथमिक शाळेचे शिक्षक रामचंद्र कुबल सांगतात पर्यावरण उपक्रमांतर्गत आडवली मध्ये मुलांनी केलेल्या सर्वेक्षणात जुन्या जाणत्या शेतकऱ्यांकडून फुलपाखरू दुर्मिळ झाल्याची माहिती मिळाली.फुलपाखरू हवेच्या शुद्धतेचे मानक आहे

 

 

परीसंस्थेतील महत्वाचा घटक असलेल्या फुलपाखरांचे प्रमाण कमी होणे हे पर्यावरणासाठी धोक्याचे होते.यामुळे बालवयातच मुलांना पर्यावरण संवर्धनाची आवड निर्माण व्हावी. त्यातूनच फुलपाखरू संवर्धन व्हावे या हेतूने आडवली शाळेच्या प्रांगणात फुलपाखरांना आकर्षित करणारया इंडीयन स्नेकविड या जातीच्या वनस्पतीची लागवड केली.सध्या फुलपाखरांच्या प्रजातींच्या असंख्य फुलपाखरांनी हा परीसर बहरून गेला आहे.यामुळे विद्यार्थ्यांची निरीक्षण शक्ती विकसित झाली.पर्यावरणाविषयी मुलांमध्ये आस्था आणि आवड निर्माण झाली. हेया उपक्रमाचे फलित असल्याचे त्यांनी सांगितले.आडवली शाळेच्या या पर्यावरण स्नेही उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.