वेंगुर्लेत आज दीपक केसरकरांच्या प्रचारार्थ नारायण राणे, उदय सामंत यांची जाहीर सभा

 

वेंगुर्ला: प्रतिनिधी : सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, आरपीआय महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ आज गुरुवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी दुपारी २.३० वाजता भाजप नेते खासदार नारायण राणे यांची जाहीर सभा वेंगुर्ला येथील स्वामिनी मंगल कार्यालय येथे होणार आहे. या सभेस शिवसेनेचे स्टार प्रचारक म्हणून उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. तरी महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर, आरपीआय तालुकाध्यक्ष विलास राठये यांनी केले आहे.