खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील चिरणी पलीकडची वाडी येथील रुचिरा रवींद्र जाधव हिला नुकतेच बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड लंडन या लंडन येथील नामांकित संस्थेने प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला आहे.
रुचिराने स्वकष्टाने चित्रपट सृष्टीत अपार मेहनत करून स्वतःच्या ठसा उमटविला आहे. नुकताच तिचा मराठी चित्रपट “बाबू”या आगरी भाषेतील चित्रपट प्रसिद्ध झाला या चित्रपटात रुचिरा हिची भूमिका प्रमुख होती. तसेच मराठी बिग बॉस सीजन ४ मध्ये तिने आपली नीतिमूल्य जपून खेळत सर्वांची मने जिंकली.बे दुने दहा या मालिकेतून पदार्पण करून माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील तिची माया माया भूमिकाप्रचंड गाजली.
अनेक मालिका व जाहिरातीमधून ती आपल्याला दिसली आहे इंटरनॅशनल ट्रॅव्हल शोसाठी व्हिएतनाम, मलेशिया, भूतान अशा विविध देशांमधून जाऊन तिने आपल्या भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यासोबतच ती शिक्षणक्षेत्र, फिटनेस तसेच विविध कलांमध्ये अग्रेसर आहे.
दरम्यान या सर्वांची दखल घेऊन वरील संस्थेने रुचिराला सन्मानित केले आहे. याबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.










