चिंचघर – प्रभुवाडी मध्ये धाडसी चोरी लाखोंचा मुद्देमाल लंपास

 

१ लाख रोख रक्कमेसह १ लाख ५३ हजाराच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी !

खेड (प्रतिनिधी) खेड तालुक्यातील चिंचघर – प्रभुवाडी येथील अनिल जयराम कदम ( वय – ५५ ) यांच्या राहत्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलुप अज्ञात चोरटयाने हत्याराने तोडून घरामध्ये प्रवेश करत घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून १ लाख रोख रक्कमेसह १ लाख ५३ हजाराच्या सोन्याच्या दागिन्यांची अशी एकूण २ लाख ५३ हजाराची धाडसी चोरी केली आहे. हि चोरी दि. ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ ते . १४ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ४ वाजताच्या मुदतीत घडली आहे.

या चोरीची फिर्याद अनिल जयराम कदम यांनी येथील पोलीस स्थानकात दिल्यानंतर पोलीसांनी १५ नोव्हेंबर २०२४ रोजी अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०५ , ३३१ (३), ३३१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

खेड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ., चोरीस गेलेल्या रुपये १ लाख रोख रक्कमेसह चोरीस गेलेल्या मुद्देमाल मध्ये सोन्याचा कुड्याचा एक जोड ., ५० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र ., ५० हजार रुपये किंमतीची दीड तोळ्याची सोन्याची चैन ., ८ हजार रुपये किंमतीची एक-एक ग्रॅमची दोन सोन्याची पाने ., १० हजार रुपये किंमतीचा सोन्याचा कुड्याचा एक जोड व १५ हजार रुपये किंमतीची पाच ग्रॅम वजनाची एक सोन्याची अंगठी असा एकूण रोख रक्कम व सोन्याचे दागिने मिळून २ लाख ५३ हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला . अधिक तपास येथील पोलीस करीत आहेत.