वैभववाडीतील भजनी बुवांनी घेतली आ. नितेश राणे यांची भेट
मोठ्या संख्येने भजनी बुवांची उपस्थिती
वैभववाडी | प्रतिनिधी : महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांना वैभववाडी तालुका भजनी कलावंत संस्थेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. पाठिंब्याचे पत्र वैभववाडी भाजपा कार्यालयात सर्व भजनी कलाकारांनी आमदार नितेश राणे यांच्याकडे सुपूर्द केले आहे.
आपले समाजकार्य आणि भजनी कलावंतांसाठी घेतलेली विशेष काळजी यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे. या निवडणुकीत आपण मोठ्या मताधिकाने विजयी व्हाल. आपल्या सहकार्यामुळे भजन क्षेत्रात कलेला योग्य ओळख मिळवण्यासाठी संधी मिळाली. आपल्या कार्यक्षेत्रात भजनी कलावंतांच्या हक्काची व कला संस्कृतीच्या संवर्धनाची आपण नेहमीच परिश्रमपूर्वक कामगिरी केली आहे. असे पत्रात म्हटले आहे. भविष्यात देखील सर्व उपक्रमांसाठी आमचा जाहीर पाठिंबा जाहीर करत आहोत. आपण आपल्या प्रभावी नेतृत्वाने आमदार म्हणून समाजाचे हित साधण्यासाठी कार्यरत रहा. तुमचं नेतृत्व आमचा विश्वास असे पत्रात म्हटले आहे.
यावेळी भजनी बुवा संजय पवार, रितेश मिस्त्री, श्रीकांत शिरसाट, मंगेश पाटणकर, शरद पवार, संतोष कोलते, यशवंत कोलते, संजय साळस्कर, प्रवीण गुडेकर, आनंद खेडेकर, संदीप खेडेकर, सुशांत सांगवेकर, गजानन तानवडे, संतोष तावडे, सतीश राणे, विठ्ठल काटे, प्रवीण घाडगे, उज्वल नारकर, किशोर पांचाळ, सुशांत तांबे, आनंद पाटणकर, जयवंत टक्के, भास्कर तानवडे, श्री कुंभार, महेश तावडे, प्रकाश पाटील, अंकुश गुरव, तुकाराम नारकर, रवी मिस्त्री, वसंत डफळे, अनंत डफळे, गणेश कांबळे, अनिल डफळे, शशांक पवार, मंगेश पावसकर, पिंट्या सुतार, विजय मिस्त्री, दीपक सकपाळ, स्वप्नील सकपाळ व इतर भजनी कलावंत उपस्थित होते.
यावेळी वैभववाडी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, प्रमोद रावराणे, किशोर दळवी व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.












