गुहागर | प्रतिनिधी : गुहागर तालुक्यातील बौद्ध समाज्यातील विविध संघटना एकवटल्या असून बौद्ध समाजातील कोणाही व्यक्तीवर झालेला हल्ला हा आमच्या बौद्ध समाजावर झाला असून आंम्ही ते कदापी सहन करणार नाही. जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक होऊन त्यांना कठोर सजा झाली पाहिजे भ्याड हल्यात जे दोषी आहेत त्यांना योग्य ते शासन झालेच पाहिजे या विचारासाठी आक्रमक पणे ठाम भूमिका मांडण्यासाठी आणि अन्याय अत्याचावर आवाज उठवून न्याय देण्यासाठी गुहागर तालुक्यातील सर्व बौद्ध संघटना एकवटल्या आहेत.
बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर, भारतीय बुद्ध सासन सभा तालुका गुहागर, भारतीय बौद्ध महासभा तालुका गुहागर या धार्मिक संघटना एकवटल्या असून गुहागर तालुक्यातील जानवळे येथे सुरेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली बैठक नुकतीच उत्साहात संपन्न झाली. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष विकास तथा अण्णा जाधव यांच्यावर झालेल्या भ्याड हल्याबाबत तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करून शांततेच्या मार्गाने तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि संबंधित यंत्रणेला निवेदन देऊन अण्णा जाधव यांचेवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना त्वरीत अटक व्हायला पाहिजे आणि कारवाई व्हावी हि आग्रही भूमिका घेण्यासाठी बैठक संपन्न झाली. यावेळी सुरेश सावंत बौद्धजन सहकारी संघ तालुका अध्यक्ष,मारुती मोहिते कार्याध्यक्ष, भिमसेन सावंत, विजू आप्पा कदम, सचिन मोहिते,दिनेश कदम, उत्तम पवार, सागर पवार, संदिप पवार, भूषण पवार, दत्ताराम कदम, संदेश कदम, संदिप कदम, विलास गमरे, मंगेश कदम, रमेश पवार,भगवान पवार, अनिल पवार विशाल पवार, महेंद्र पवार, मंदार हुलसार, सिध्दार्थ गमरे,दशरथ पवार, मिलिंद पवार, मनिष गमरे , राकेश पवार, राकेश चाफे, शशिकांत जाधव, शशिकांत गमरे, कमलाकर पवार, चंद्रकांत मोहिते, सुभाष जाधव, रत्नदिप जाधव, दिपक गमरे, वैभव पवार, संदिप पवार, संतोष मोहिते. सुशिल जाधव, रामचंद्र पवार, चंद्रकांत पवार नंदकुमार पवार, विकास पवार, सचिन पवार,विद्याधर विठ्ठल कदम, नरेश कांबळे,बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर, भारतीय बुद्ध सासन सभा तालुका गुहागर, भारतीय बौद्धमहा सभा तालुका गुहागर या संघटनांचे प्रमुख सभासद उपस्थित होते