विनोद तावडे राज्यसभेवर बिनविरोध : जि. प. सदस्य प्रमोद रावराणे यांनी केले अभिनंदन

वैभववाडीत आनंदाचे वातावरण 

वैभववाडी l प्रतिनिधी :   भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस तथा राज्याचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. निवडीनंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे यांनी त्यांची मुंबई येथे भेट घेत अभिनंदन केले. विनोद तावडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यांचे वैभववाडी तालुक्यावर विशेष प्रेम आहे. महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था त्यांची वैभववाडीत कार्यरत आहे.

संघ स्वयंसेवक, आमदार, विरोधी पक्षनेता, शिक्षण मंत्री या पदावर त्यांनी चांगले काम केले आहे. भाजपा राष्ट्रीय सरचीटणीस पदावर ते काम करत आहेत. त्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड होताच तालुक्यात सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे.