खेड (प्रतिनिधी)येथील पेंशनर असोसिएशन व कांची कांस्य थेरपी सेंटर खेड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.१७ रोजी महाडनाका ब्रहमकुमारी सेवा केंद्र समोर मोफत कांस्य थेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात वीस पेक्षा जास्त जेष्ठ नागरिक महिला व पुरुषांनी मोफत थेरपी घेतली.
खेड शहरातील महाडनाका येथील ब्रह्मकुमारी सेवा केंद्र समोर कांस्य थेरपी सेंटर सुरू झाले आहे. गुडघे दुःखी, सांधे दुखी, वात, पित्त व कफ प्रकोप, अर्धशिर्शी, आदींसह थकवा दूर करून निद्रानाशाची समस्या कमी होण्यास या थेरपीचा फायदा होतो. या केंद्राच्या वतीने सामजिक दायित्व म्हणून खेड तालुका पेन्शनर असोसिएशन यांच्या सहकार्याने जेष्ठ नागरिकांसाठी एक दिवसीय मोफत कांस्य थेरपी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात सहभागी होण्यासाठी नावे नोंदवलेल्या जेष्ठ नागरिकांना थेरपीची संपूर्ण माहिती देऊन प्रत्येकी दहा मिनिटांचा पदाभ्यंग देण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी कांची कांस्य थेरपी सेंटरचे संचालक तथा पत्रकार अनुज जोशी व सौ.स्वरा जोशी, कर्मचारी मेहविश कासकर, श्रुती खोपकर यांचे आभार मानले.











