*उद्या २३नोव्हेंबर रोजी*
*दापोली तहसीलदार कार्यालय ते बुरोंडी नाका मार्ग वहातूकिसाठी रहाणार बंद*
*दापोली प्रतिनिधी:-*
उद्या दि. २३नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत दापोली तहसील कार्यालय ते बुरोंडी नाका ते तहसील कार्यालय या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पहाटे पाच वाजल्यापासून ते मतमोजणी पूर्ण होईपर्यंत पूर्णतः बंद रहाणार आहे
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची प्रक्रिया सुरु असून दि. २० नोव्हेंबर २४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडलेली असून दि. २३ नोव्हेंबर २४ रोजी दापोली मतदार संघात दापोली पोलीस ठाण्याचे हद्दीत डॉ. बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ येथील सर विश्वेश्वरैय्या सभागृह या सभागृहा मध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.
त्यावेळी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार यांचे समर्थक व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार यांचे समर्थक, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार यांचे समर्थक व बसपा, अपक्ष उमेदवार यांचे समर्थक निकाल ऐकण्यासाठी बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ येथील सर विश्वेश्वरैय्या सभागृह येथे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी तसेच बाहतुकीची कोंडी होवू नये याकरिता दि. २३नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वा. पासून मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत दापोली तहसील कार्यालय ते बुरोंडी नाका ते तहसील कार्यालय या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतुक पुर्णता बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती चंद्रकांत सूर्यवंशी अपर जिल्हाधिकारी रत्नागिरी यानी प्रसिद्धिपत्रकानुसार दिली आहे.
*पर्यायी मार्ग…*
मार्ग …दापोली मच्छीमार्केट रोड येथून बाजारपेठ-नटराज नाका ते फॅमिलीमाळ पासून बुरोंडी नाका
तसेच
आसरा पूल येथून नर्सरी रोड पासून लाल कट्टा ते बुरोंडी नाका असे पर्यायी मार्ग आहे. तसेच पोस्ट गल्लीतून नटराज नाका ते फॅमिलीमाळ ते बरोंडी नाका असे जाता येणार आहे.
दापोलीकरांनी उद्या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.










