उद्धव ठाकरे आता तरी माती खायची बंद करा
मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना सणसणीत टोला लागवला आहे. उद्धव ठाकरे आता तरी माती खायची बंद करा. असे आ. निलेश राणे म्हणाले.

महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला नाकारलं तुम्ही पदावर असताना ज्यांना संपवायचा प्रयत्न केलात ते सगळे यशस्वी झाले. तुम्ही ज्यांची घरे पडायला निघाला होतात ते सगळे आमदार, खासदार झाले. तुमची आणि तुमच्या मुलाची भाषा जनतेने नाकारली. तुमची आणि तुमच्या कुटुंबाची घमेंड उतरवली. आता नाही सुधरलात तर आयुषभर तुम्हाला आणि तुमच्या मुलाला मातीच खावी लागणार. असेही आ. निलेश राणे म्हणाले.












