इन्सुली राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
सिंधुदुर्ग (बांदा):गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर बांदा सटमटवाडी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली पथकाने मोठी कारवाई करत बेकायदेशीर मद्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडला आहे. या कारवाईत मद्यसाठा आणि वाहनासह एकूण ११ लाख ६८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका संशयीताला ताब्यात घेण्यात आले आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली तपासणी नाक्यावरील पथकाला गोवा-मुंबई महामार्गावरून अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे मंगळवारी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास बांदा येथील हॉटेल विवा क्लासिक समोर सापळा रचण्यात आला.
यावेळी गोव्याकडून बांद्याच्या दिशेने येणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या ‘टाटा इंट्रा’ मालवाहू वाहनाची (इन्सुली चेकपोस्टवर राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त
सिंधुदुर्ग (बांदा):
गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत बेकायदेशीर मद्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडला आहे. या कारवाईत मद्यसाठा आणि वाहनासह एकूण ११ लाख ६८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली (ता. सावंतवाडी) तपासणी नाक्यावरील पथकाला गोवा-मुंबई महामार्गावरून अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे २३ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास बांदा येथील हॉटेल विवा क्लासिक समोर सापळा रचण्यात आला.
यावेळी गोव्याकडून बांद्याच्या दिशेने येणाऱ्या मालवाहू वाहनाची (क्र. MH-10-DT-5307) तपासणी केली असता वाहनाच्या मागील हौद्यात तयार केलेल्या चोर कप्प्यात आणि सिमेंटच्या विटांखाली लपवून ठेवलेले गोवा बनावटीचे विदेशी मद्य आढळून आले.
यात विविध ब्रँडचे ३६ बॉक्स (किंमत अंदाजे ३,६८,६०० रुपये) व मालवाहू गाडी (किंमत अंदाजे ८,००,००० रुपये) असा एकूण ११,६८,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी वाहन चालक प्रविण महावीर बोराडे (वय ३० वर्षे, रा. वैरागवडी, ता. माढा, जि. सोलापूर) याला ताब्यात घेण्यात आले. करण्यात आली आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर आणि सिंधुदुर्गच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईच्या पथकात दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे, विवेक कदम, जवान रणजीत शिंदे, दीपक वायदंडे, सागर सुर्यवंशी, अभिषेक खत्री आणि सतिश चौगुले यांचा समावेश होता. पुढील तपास दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे करत आहेत.












