Rajarshi Shahu Maharaj Memorial Day celebrated in Karul Vidyalaya
100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला वाहिली आदरांजली
वैभववाडी | प्रतिनिधी : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा 101 वा स्मृतिदिन करुळ येथील माध्यमिक विद्यालयात साजरा करण्यात आला. स्मृतिशताब्दी वर्ष सांगता निमित्त उपस्थितांनी शंभर सेकंद स्तब्ध राहून लोकराजाला आदरांजली वाहिली.
यावेळी करुळ सरपंच नरेंद्र कोलते, माजी पं. स. सदस्य बाळा कदम, मुख्याध्यापक दीपक घाटगे, उपसरपंच सचिन कोलते, शिक्षक विलास गुरव, श्री. नानगुरे, श्री. जाधव, वैभव पाटील, अर्चना पाटील, श्री. तावडे, उदय कदम, तीर्थराम गुरव, कर्मचारी दत्ता पाटील, नागेश पांचाळ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सरपंच नरेंद्र कोलते, मुख्याध्यापक श्री. घाटगे, विलास गुरव तसेच विद्यार्थी यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना पाटील यांनी तर आभार वैभव पाटील यांनी मानले.












