लांजा (प्रतिनिधी) कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून विजयी झालेले नवनिर्वाचित आमदार निलेश राणे यांची लांजा येथील भाजपाचे गटनेते संजय यादव यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले .
लांजा येथील भाजपाचे नगरसेवक आणि नगरपंचायतीमधील गटनेते असलेले संजय यादव हे निलेश राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. नुकत्याच पार पडलेल्या कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार असलेले माजी खासदार, निलेश राणे यांनी विजय संपादन केला आहे .याबद्दल नवनिर्वाचित आमदार निलेश राणे यांचे संजय यादव यांनी भेट घेतली आणि विशेष अभिनंदन केले.
आपण कायम तुमच्या सोबत आहोत असे आश्वासन यावेळी नवनिर्वाचित आमदार निलेश राणे यांनी संजय यादव यांना दिले.












