संविधान दिनाचे निमीत्ताने मंडणगड येथे संविधान सन्मान रँलीसह शाळांना संविधान पुस्तकिचे वाटप, शिक्षण विभागाचा उपक्रम,

मंडणगड | प्रतिनिधी  भारतीय संविधानातील मुलभूत हक्कांसोबत त्यात दिलेली मुलभूत कर्तव्यांचे पालन सर्वांनी करणे आवश्यक आहे. आज शाळांना देण्यात आलेल्या संविधानामार्फत त्यातील संविधानाचे बीज विद्यार्थ्यांच्या अंगी बिंबवून त्यांना भविष्याच्या दृष्टीने संस्कारीत घडविण्याचे कार्य करणे हे देशाच्या उन्नती व प्रगतीसाठी महत्वाचे असल्याचे प्रतिपादन मंडणगड न्यायालयाचे न्यायमुर्ती एम.ए. शिंदे यांनी केले. संविधान सन्मान दिनाचे निमीत्ताने आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना श्री. शिंदे यांनी संविधान दिनाचे महत्व सांगताना जीवनात संविधान किती महत्वाचे आहे हे सांगीतले. स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधूता या मुतत्वांवर आधारीत संविधानाच्या आधारे देशाची न्यायित व्यवस्थेची कार्यपध्दती व त्यातील नागरिकांचे मलभूत हक्क विविध दाखल्यांसहित पटवून दिले. पंचायत समिती मंडणगड शिक्षण विभागाच्यावतीने भारतीय संविधानास पंच्याहत्तर वर्षे पुर्ण झाल्याचे निमीत्ताने संविधान अमृत महोत्सव 26 नोव्हेंबर 2024 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 

 

या निमीत्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कुल मंडणगड ते तहसिल कार्यालय भिंगळोली अशी भव्य दिव्य संविधान सन्मान रँली काढण्यात आली या शोभायात्रेचे महापुरुषांच्या वेशभुषा धारण केलेले विद्यार्थी व संविधाना विषयी जागृत करणारे फलक आकर्षण ठरले. संविधान यात्रेत तालुक्यातील सुमारे तीन हजार विद्यार्थी शिक्षक विविध शासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. यानंतर पंचायत समिती मंडणगडचे जिजामाता सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमात आय.एस.वो शाळा शेनाळे येथील विद्यार्थ्यांनी संविधान गीत सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळविली यानंतर तालुक्यातील 25 माध्यमीक शाळा, व 147 जिल्हा परिषद प्राथमीक शाळांना भारतीय संविधानाच्या पुस्तक रुपातील प्रतींचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास मंडणगड न्यायालयाचे न्यायमुर्ती एम. ए. शिंदे, नायब तहसिलदार संजय गुरव, गटशिक्षण अधिकारी नंदलाल शिंदे, पोलीस उपनिरिक्षक संजय धुपकर, बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. मिलिंद लोखंडे, सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तावीक नंदलाल शिंदे व सुत्रसंचालन शांताराम पवार यांनी केले.