राजापूर (वार्ताहर): येथील राजापूर अर्बन को. ऑप. बँकेच्या जानशीपठार (मिठगवाणे) शाखेचा स्थलांतर सोहळा शुक्रवार दि. २९ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता बँकेच्या अध्यक्षा सौ. अनामिका जाधव यांचे अध्यक्षतेखाली, मिठगवाणे सरपंच सौ. आशा काजवे यांचे शुभहस्ते आणि ATM सेवेचा शुभारंभ निवेली सरपंच सौ. स्नेहा कुवेसकर, यांचे हस्ते आयोजित करण्यात आला आहे.
बँकेची जानशीपठार (मिठगवाणे) शाखा चिरेखण मिठगवाणे येथे स्थलांतरीत होत आहे. या वेळी एटीएम सेवेचा शुभारंभ तसेच श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे.
यावेळी सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक यांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन उपाध्यक्ष विवेक गादिकर, व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष अड. शशिकांत सुतार, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे, शाखाधिकारी समीर चव्हाण यांनी केले आहे.










