‘जबलपूर-कोईमतूर’ धावली ५ तास लेट

 

खेड (प्रतिनिधी) कोकण मार्गावरून धावणारी जबलपूर- कोईमतूर गाडी रविवारी ५ तास लेट धावल्याने प्रवाशांची रखडपट्टी झाली. ‘विकेंड’लाच उशिराने धावलेल्या गाडीमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. गाडी विलंबाने धावण्यामागचे नेमके कारण समजू शकले नाही.

या गाडीपाठोपाठ एलटीटी-मडगाव एक्स्प्रेससह सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेसही १ तास उशिराने रवाना झाली. गोवा संपर्कक्रांतीसह निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस ही एक तास लेट धावली