रत्नागिरी, : कॉम्प्युटर लिटरेसी डे निमित्त गोगटे-जोगळेकर कॉलेजच्या संगणकशास्त्र विभागात "Robotics using IoT
Sensors and Devices" या विषयावर भव्य प्रदर्शनी आयोजित करण्यात आली. या प्रदर्शनीत संगणकशास्त्र
विभागातील द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्प सादर केले. या प्रकल्पांमध्ये Arduino Uno, IR
Sensor, Flame Sensor, Soil and Moisture Detector, Sound Sensor, Touch
Sensor, Remote Control Car यांसारख्या अत्याधुनिक उपकरणांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी
उपस्थितांना प्रकल्पांची माहिती सोप्या आणि प्रभावी पद्धतीने दिली.
प्रदर्शनाचा शुभारंभ कॉलेजचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांतील
नाविन्यपूर्णतेचे आणि मेहनतीचे कौतुक केले. शास्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी देखील प्रदर्शनाची
दखल घेत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
प्रदर्शनाला अभ्यंकर-कुलकर्णी ज्युनियर कॉलेजचे सुमारे 400 विद्यार्थी आणि विज्ञान विभागातील शिक्षक, तसेच गोगटे-
जोगळेकर सिनियर कॉलेजमधील जवळपास 300 विद्यार्थी आणि विविध विभागातील प्राध्यापक उपस्थित होते.
उपस्थित सर्वांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे आणि तांत्रिक कौशल्याचे मनापासून कौतुक केले. या कार्यक्रमासाठी
अभ्यंकर-कुलकर्णी महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. गोसावी सर आणि विज्ञान विभाग प्रमुख श्री. शिंगाडे सर यांचे विशेष
सहकार्य लाभले.
संगणकशास्त्र विभागाच्या समन्वयक श्रीमती अनुजा घारपुरे, विभागप्रमुख श्री. अमोल सहस्रबुद्धे तसेच विभागातील इतर
प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी संगणकशास्त्र विभागातील प्रा. सनील सावले
आणी प्रा. प्रसाद पुसाळकर यानी विशेष मेहनत घेतली . या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना IoT आणि Robotics क्षेत्रातील
नवकल्पना सादर करण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ मिळाले.
संगणकशास्त्र विभागाने आयोजित केलेली ही प्रदर्शनी यशस्वीपणे पार पडली. विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांनी उपस्थितांवर छाप
पाडत तांत्रिक शिक्षणाला एक नवा आयाम दिला.











