खेड (प्रतिनिधी)
भारतीय घटनाकार डॉ बाबासाहेबआंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनी शहरातील जिजामाता उद्यानातील डॉ बाबासाहेबआंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्या साठी तालुक्यातील विविध गावातील नागरिक अभिवादन करण्या साठी आल्याने जण सागरच लोटला होता
६८ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्व संध्येला खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघाच्या वतीने तालुकाध्यक्ष मंदार हळदे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन ते जिजामाता उद्यान अशी कँडल मार्च पद यात्रा काढून महामानवाला अभिवादन करण्यात आले
६ डिसेंबर रोजी सकाळी विविध संघटना, पक्षच्या वतीने अभिवादन करण्यात आले दिवसभर अभिवादन करण्या साठी अनुयायी येतच होते यावेळी विविध पक्ष व संघटनांनी अनुयायां साठी पाणी, चहा बिस्कीट वाटप यांचे स्टोल लावले होते











