मळगांव श्री देव भूतनाथ देवस्थानचा जत्रोत्सव उत्साहात

सावंतवाडी । प्रतिनिधी : मळगाव गावचे ग्रामदैवत श्री देव भूतनाथ देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवारी भक्ती पूर्ण वातावरणात संपन्न झाला. सोनुर्लीप्रमाणेच लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या जत्रेला शेकडो भाविकांनी लोटांगणाचा नवस फेडला.

सावंतवाडी शहराच्यालगत असलेल्या मळगांव घाटीच्या पायथ्याशी स्थानापन्न असलेल्या मळगाव गावचे ग्रामदैवत श्री देव भूतनाथ देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवारी संपन्न झाला. त्यानिमित्त सकाळी पूजा व अन्य धार्मिक विधी संपन्न झाल्यानंतर दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी दर्शन, विठलादेवीची ओटी भरणे, नवस फेडणे अधिक कार्यक्रम उशिरापर्यंत सुरू होते.